By  
on  

अभिनेत्री स्मिता गोंदकरने असा साजरा केला रक्षाबंधनाचा सण

आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने सेलिब्रिटी मंडळीही हा सण उत्साहात साजरा करत आहेत. कोरोनाग्रस्त परिस्थितीतही हा सण कलाकार आनंद आणि उत्साहात साजरा करत आहेत. 

सोशल मिडीयावरही रक्षाबंधनाच्या निमित्ताने सेलिब्रिटींच्या त्यांच्या भावा बहीणीसोबतच्या पोस्ट पाहायला मिळत आहेत.

अभिनेत्री स्मिता गोंदकरनेही दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे. यानिमित्ताने स्मिता तिचा भावंडांना भेटली. शिवाय स्मिता तिच्या वहिनीलाही राखी बांधते. नुकतेच तिने रक्षाबंधनाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. 

या पोस्टमध्ये स्मिता लिहीते की, "यावर्षीच्या रक्षाबंधनाचे काही क्षण, परेश, रोहीत आणि आनंद गोंदकर तुम्हाला मिस केले. हा सुंदर दिवस भावा बहिणींसाठी कायम लक्षात राहण्यासारखा असतो. हा दिवस मजेत घालवा. सगळ्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा "

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive