By  
on  

पाहा Video : मराठी बिग बॉस फेम शिव ठाकरेने शेयर केला रक्षाबंधनाचा हा मजेशीर व्हिडीओ

आज सोशल मिडीयावरही रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळतोय. सोशल मिडीयावर मनोरंजन विश्वातील कलाकारांनी त्यांच्या बहिण-भावांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. सगळीकडेच राखीपौर्णिमेचा आनंद आहे.

मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा विजेत शिव ठाकरेनेही उत्साहात रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे. बहिण मनिषासोबत त्याने मस्ती करत हा सण साजरा केला. यावेळी राखी बांधताचाना व्हिडीओ शिवने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. शिव आणि त्याची बहिण मनिषा हे नातं बहिण भावापेक्षा मैत्रीचं जास्त आहे. तो बहिणीचा जितका आदर करतो तितकाच तिच्यासोबत मस्तीही करतो.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9) on

 

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात एका टास्क दरम्यान त्याची आई आणि बहिण मनिषादेखील बिग बॉसच्या घरात आल्या होत्या. मनिषा ही शिवची मोठी बहिण आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive