By  
on  

पाहा Photos : ऑफस्क्रिन अशी आहे 'रंग माझा वेगळा' मधील दीपा आणि सौंदर्या इनामदार यांची केमिस्ट्री

'रंग माझा वेगळा' ही मालिका कमी कालावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेचा प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली. सावळ्या रंगाची दीपा आणि या रंगाचा द्वेष करणारी दिपाची सासू सौंदर्या इनामदार असं कथानक असलेली ही मालिका आहे. मात्र आंतरिक सौंदर्य हे महत्त्वाचं हे सांगणारी ही मालिका आहे. 

या मालिकेत ऑनस्क्रिन दीपाचा द्वेष करणारी सौंदर्या या मालिकेत पाहायला मिळते. मात्र ऑफस्क्रिन या दोन्ही कलाकारांची चांगली केमिस्ट्री आहे. दीपा साकारणारी रेश्मा शिंदे आणि सौंदर्या साकारणारी अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांची ऑफस्क्रिन चांगली मैत्री असल्याचं पाहायला मिळतय. रेश्मा शिंदेने नुकतेच सोशल मिडीयावर हर्षदा यांच्यासोबतचे सेटवरील काही फोटो पोस्ट केले आहेत.

कार्तिकसोबत लग्न करून दीपा इनामदारांच्या घराची सून बनली आहे. मात्र तरीही सौंदर्य़ा इनामदार कट कारस्थान रचून दीपाला त्रास देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. आता पुढे या मालिकेला काय वळण मिळतय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive