अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लॉकडाउनच्या आधीपासूनच फियान्से कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत आहे. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोघांनी साखरपुडाही केला. सध्या सोनाली दुबईत कुणालसोबत छान वेळ घालवत आहे.
आज कुणालच्या वाढदिवसानिमित्ताने सोनालीने कुणालला सोशल मिडीयावरही शुभेच्छा दिल्या आहेत. नुकतच दोघांनी खास फोटोशुट केलं होतं. या फोटोंमध्ये हे कपल सुंदर दिसत आहे. एकमेकांना मॅचिंग असे आउटफिटही दोघांनी या फोटोंमध्ये परिधान केले आहे.
या फोटोशुटचे सुंदर फोटो पोस्ट करुन सोनाली लिहीते की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा फियान्से कुणाल. हा तुझा तिसरा वाढदिवस आहे जो आपण सोबत सेलिब्रेट करत आहोत. तू एक अप्रतिम मुलगा आहेस. आता मी तुझी मिसेस बनण्यासाठी जास्त प्रतिक्षा नाही करु शकत. आणि येणारे तुझे कित्येक वाढदिवस आपण सोबत साजरे करु."
या पोस्टमध्ये सोनाली मिसेस होण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हणतेय. तेव्हा साखरपुड्यानंतर लवकरच दोघं लग्नही करणार असल्याचं या पोस्ट मधून लक्षात येतय. सोनालीचे चाहतेही तिला वधूच्या रुपात पाहण्यासाठी उत्सुक असतील यात शंका नाही.