By  
on  

वडिल संदीप पाटील यांच्याकडून मुलगा चिरागने घेतले क्रिकेटचे धडे

अभिनेता चिराग पाटील हा बॉलिवुड फिल्म '83'मध्ये झळकणार आहे. या सिनेमात चिरागने वडिल आणि पूर्व क्रिकेटर संदीप पाटील यांचीच भूमिका साकारली आहे. 1983 मध्ये भारताने जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्डकप विषयी हा सिनेमा आहे.

नुकतच चिरागने वडिल संदीप पाटील यांच्यासोबतचे काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये तो लिहीतो की, "मास्टर कडूनच क्रिकेटची शिकवणी" असं तो या पोस्टमध्ये म्हणतोय. वडिलांकडूनच क्रिकेटचे धडे घेत असल्याचं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

संदीप पाटील यांची क्रिकेट खेळण्याची स्टाईल आणि बऱ्याच गोष्टी या सिनेमाच्या निमित्ताने चिरागने आत्मसाद केल्या आहेत. शिवाय स्वत: संदीप पाटील यांचा मुलगा असल्याने काही गोष्टी त्याला वडिलांकडूनच उपजत मिळाल्या असतील यात शंका नाही.  

 

संदीप पाटील यांच्या भूमिकेत चिराग काय कमाल करतोय हे '83' सिनेमात पाहणं महत्त्वाचं ठरेल.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive