ज्येष्ठ अभिनेता दिलीप प्रभावळकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध कलाकारांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिलीप प्रभावळकर हे फक्त उत्तम अभिनेताच नाही तर एक उत्तम व्यक्तिमत्त्व असल्याचं या शुभेच्छांवरून पाहायला मिळतय.
अभिनेत्री सुकन्या मोने यांनीदेखील दिलीप प्रभावळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'चूकभूल द्यावी घ्यावी' या मालिकेत दोघांनी एकत्र काम केलं होतं. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी या मालिकेची खास आठवण शेयर केली आहे.
सुकन्या या पोस्टमध्ये लिहीतात की, "ज्यांच्याबरोबर काम करताना खूप मज्जा आली,खूप काही नकळत शिकता आलं अश्या दिलीप भैय्यांना म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके चिमणराव म्हणजेच दिलीप प्रभावळकरांना वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा."
प्रिय दिलीपकाका..
Happy birthday तुम्हाला चांगल्या प्रकृतीसाठी, सुंदर कामांसाठी आणि मनन चिंतनासाठी निवांतपणा मिळावा म्हणून खू ऽ ऽ ऽ प शुभेच्छा खूप प्रेम #DilipPrabhavalkar pic.twitter.com/aqlwNOkBx6— sonalikulkarni (@sonalikulkarni) August 4, 2020
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही सोशल मिडीयावर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोनालीने पोस्टमध्ये म्हटलय की, "प्रिय दिलीपकाका, वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला चांगल्या प्रकृतीसाठी, सुंदर कामांसाठी आणि मनन चिंतनासाठी निवांतपणा मिळावा म्हणून खूप शुभेच्छा खूप प्रेम."