By  
on  

11 वर्षांपूर्वी अशी दिसायची ही अभिनेत्री, आहे प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी

सध्या सोशल मिडीयावर थ्रोबॅक पोस्टचा ट्रेंड सुरु आहे.  यातच मनोरंजन विश्वातील कलाकार, सेलिब्रिटी सोशल मिडीयावर त्यांचे जुने फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत आहेत. त्यांच्या या थ्रोबॅक आठवणी पाहणं मजेशीर ठरतय. 

अभिनेत्री सुखदा खांडकेकरने देखील तिचा एक थ्रोबॅक फोटो पोस्ट केला आहे. तिने तिचा 11 वर्षांपूर्वीचा ब्लॅक एन्ड व्हाईट फोटो पोस्ट केला आहे. सुखदाचा हा थ्रोबॅक फोटो पाहून तिच्या चाहत्यांना आनंद झाला असेल एवढं नक्की.

 

सुखदा ही विविध मराठी सिनेमे आणि मालिकांमध्ये झळकली आहे. शिवाय ती प्रशिक्षित कथक डान्सर आहे. 'बाजीराव मस्तानी' या हिंदी सिनेमातही सुखदाची महत्त्वाची भूमिका होती. सुखदा ही अभिनेता अभिजीत खांडकेकरची पत्नी आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive