'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेतील सुमी आणि समरची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. सुमीची भूमिका सााकारणार अभिनेत्री अमृता धोंगडे आणि समरची भूमिका साकारणारा तेजस बर्वे यांच्या कामालाही पसंती मिळाली. यांची जोडीही आता लोकप्रिय झाली आहे. त्यातच सुमीचा हटके अंदाजही सगळ्यांना आवडतो. मात्र नुकतच सुमीचा स्वॅग पाहायला मिळाला आहे.
सुमीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अमृता धोंगडेने नुकतच तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये अमृताचा साडीमधील स्वॅग लुक पाहायला मिळतोय. या लुकमध्ये पाढंऱ्या रंगाची साडी, लाल रंगाचा ब्लाउज, केसात गजरा माळलेला, दागिने, बिंदी आणि स्वॅग म्हणून गॉगल असा तिचा हा लुक आहे. तिच्या चाहत्यांनाही तिचा हा लुक प्रचंड आवडला आहे.
कमी कालावधीत लोकप्रिय झालेल्या 'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेतील सुमीच्या भूमिकेत अमृताला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. तिचा चाहतावर्गही तयार झाला आहे. सोशल मिडीयावरही तिचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत.