By  
on  

बिग बॉस 11 ची विजेती शिल्पा शिंदेचा मराठी मालिकेतला परफॉर्मन्स तुम्ही पाहिलात का?

भाभी जी घर पर है मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिल्पा शिंदेने बिग बॉस 11 या रिएलिटी शोचं विजेते पद पटकावलं आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. आता शिल्पा शिंदे नुकतीच एका मराठी मालिकेत झळकली. स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'छत्रीवाली'मध्ये तिचा स्पेशल अपिरन्स पाहायला मिळाला.

स्टार प्रवाहवरील 'छत्रीवाली' या मालिकेत विक्रमच्या साखरपुड्याचं धमाकेदार सेलिब्रेशन याचं निमित्त होतं. यात शिल्पा पाहुणी कलाकार म्हणून झळकली. मराठमोळ्या अंदाजात झळकणा-या शिल्पाचे या मालिकेतील सेटवरील फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत.

https://www.instagram.com/p/BtF3lkDnpfB/?utm_source=ig_embed

खरं तर शिल्पा शिंदे ही  मराठी मुलगी असली तरी तिने आत्तापर्यंत फक्त हिंदी मालिकांमधून अभिनय साकारला आहे पण प्रथमच ती मराठी मालिकेत झळकली. सर्वांनाच शिल्पाचा हा परफॉर्मन्स पाहण्याची प्रचंड उत्सुकता होती. 'छत्रीवाली' मालिकेचा हा एपिसोड खुप धमाकेदार ठरणार यात शंका नाही.

https://www.instagram.com/p/BtGcvP5HqkF/?utm_source=ig_embed

Author

Recommended

PeepingMoon Exclusive