‘माझा होशील ना’ या मालिकेला आता वेगळं वळण मिळालेलं आहे. यातच आता मालिकेत चटकदार चवदारमध्ये कांदेपोह्यांचा कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमासाठी अभिनेत्री गौतमी देशपांडे म्हणजेच मालिकेतील सई एका अनोळखी मुलाला भेटणार आहे. याविषयीची माहिती तिने तिच्या इन्स्टाग्राम व्हिडीओमधून दिली आहे.
एकीकडे सईचे आईवडील तिच्या लग्नासाठी विविध स्थळांचा शोध घेत आहेत. तर आदित्यच्या घरीही अशीच परिस्थिती आहे. मात्र दोघांनाही हे मान्य नाही. मात्र तरीही दोघं यासाठी तयार झाले आहेत. त्यातच आता सई एका अनोळखी मुलाला भेटणार असल्यानं मालिकेच्या येणाऱ्या भागात नेमकं काय पाहायला मिळेल यासाठी गौतमीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
आता हा अनोळखी मुलगा कोण असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.