'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनाया परतली आहे. अभिनेत्री रसिका सुनील पुन्हा या मालिकेत शनाया म्हणून दिसत आहे. 2018मध्ये रसिकाने ही मालिका सोडली होती. आणि तिच्याजागी अभिनेत्री ईशा केसकरने ही भूमिका साकारली होती. फिल्ममेकिंगच्या शिक्षणासाठी रसिका भारताबाहेर न्यूयॉर्कला गेली होती. या दरम्यान तिने बऱ्याच गोष्टी केल्या.
रसिकाने एका शॉर्ट फिल्ममध्येही काम केलं होतं. या शॉर्ट फिल्ममध्ये रसिकाने समलैगिक संबंध असलेलं कॅरेक्टर साकारलं होतं. आणि याच शॉर्ट फिल्मची छोटीशी झलक रसिकाने नुकतीच तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ती लिहीते की, "वाईल्ड गीस! मॅरी ऑलिवरची कविता. ही कविता या शॉर्ट फिल्मचा सुंदर सार जोडते. मला हे कधीपासून शेयर करायचं होतं. माझ्या आवडत्या सीनचा हा छोटासा भाग आहे. जे मला परफॉर्म करायला आवडलं होतं. धन्यवाद डेवानी माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी की मी वनेसाचं कॅरेक्टर करू शकेल. माझ्यावर असलेला विश्वासाने मला हे करण्यासाठी प्रोत्साहित केलं. मी मान्य करते की मी नरवस होते. पण या शॉर्ट फिल्मने मला प्रेम हेच उत्तर असल्याचं स्पष्ट केलं. आणि हेच प्रेम मला या सिनेमाशी जोडलेल्या सगळ्यांसाठी वाटतय."
रसिकाने काम केलेल्या या शॉर्टफिल्मला पुरस्कारही मिळाले होते.