पाहा Video : 'मिसेस मुख्यमंत्री'मधील सुमीच्या घायाळ करणाऱ्या अदा, असा लुटला पावसाचा आनंद

By  
on  

'मिसेस मुख्यमंत्री' मालीकेतील सुमीचा आता मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. अभिनेत्री अमृता धोंगडे ही भूमिका साकारत आहे. या भूमिकेमुळे ती चांगलीच लोकप्रिय झाली आहे. साताऱ्यात या मालिकेचं चित्रीकरण सुरु असतं. आणि तिथे अमृता सध्या पावसाचा आनंद लुटत आहे. अभिनेता तेजस बर्वे या मालिकेत समरची भूमिका साकारतोय. दोघांची जशी ऑनस्क्रिन केमिस्ट्री आहे तशीच ऑफस्क्रिनही दोघांची चांगली मैत्री आहे. साताऱ्यात दोघंही सध्या पावसाचा आनंद लुटत आहेत. 

नुकताच अमृताने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत अमृता पावसाचा आनंद लुटताना दिसत आहे. 'जरा जरा बेहेकता' है या गाण्यावर तिने हा व्हिडीओ केला आहे. तेजसने तिचा हा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केला आहे. अमृताच्या चाहत्यांनाही तिच्या या घायाळ करणाऱ्या अदा प्रचंड आवडल्या आहेत. या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव झाला आहे. 

 

अमृतासह तेजसनेही पावसात मजा करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ अमृताने कॅमेऱ्यात कैद केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#SRK Fan ️ . . . Credits : @amrutadhongadeofficial . . . #slowmo #srk #king #️

A post shared by Tejas Barve (@tejas.barve_) on

 

Recommended

Loading...
Share