अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री स्मिता गोंदकर यांची रोमँटिक केमिस्ट्री नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका गाण्यामधून पाहायला मिळतेय. 'मन सूना' हे नवं गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात पुष्कर आणि स्मिता पाहायला मिळत आहेत.
या गाण्यात अपूर्ण प्रेमाची कहाणी पाहायला मिळतेय. पुष्कर आणि स्मिता यांनी याआधी एकमेकांसोबत अशा पद्धतिने कामं केलं नव्हतं. या गाण्याच्या निमित्ताने दोघं पहिल्यांदाच एकत्र झळकले आहे. मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात दोघं स्पर्धक म्हणून पाहायला मिळाले होते. तेव्हा दोघांची मैत्री झाली होती. या गाण्यात मात्र दोघांची चांगली केमिस्ट्री पाहायला मिळतेय.
प्रसिद्ध मराठी रॅपर शंभोने हे गाणं लिहीलं असून या गाण्यात त्याचा रॅप आहे. केवल वालंजने हे गाणं गायलं आहे.