By  
on  

अभिनेत्री गौतमी देशपांडेकडून कृष्ण जन्माष्टमीच्या सुरेल शुभेच्छा

आज सगळीकडे कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने उत्साहपूर्ण वातावरण आहे. एकमेकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छाही दिल्या जात आहेत. यातच सोशल मिडीयावर कृष्ण जन्माष्टमीच्या पोस्टचा पाऊस पडलाय. अभिनेत्री गौतमी देशपांडेने देखील तिच्या चाहत्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

मात्र या शुभेच्छांचा अंदाज हटके आहे. गौतमीने 'सखी गं, मुरलीमोहन मोही मना' हे गाऊन सुरेल शुभेच्छा दिल्या आहेत. गौतमीला गाण्याची प्रचंड आवड असून तिचं सुरेल गायन कित्येकदा पाहायला मिळालं आहे. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची बहीण आहे. मात्र गौतमीने कलाविश्वात तिच्या अभिनयाने आणि सुरांनीदेखील वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive