By  
on  

सारंग साठ्ये दिसतो 70च्या दशकातील या अभिनेत्यासारखा , निपुण धर्माधिकारीने केली पोस्ट

अभिनेता सारंग साठ्येच्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मिडीयामध्ये त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मनोरंजन विश्वातील त्याचे मित्रमंडळींनीही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सारंग साठ्येचा मित्र आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीने त्याला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. 

'27 डाउन' या सिनेमातील काही फोटो पोस्ट करून निपुणने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तो या पोस्टमध्ये लिहीतो की, "तुझ्या वाढदिवसाला मी आज जगाला तुझं गुपित सांगणार आहे. 27 डाउन या 1974 मधील अवतार कौल यांच्या सिनेमातील हे फोटो, ज्यात तू राखीजी यांच्यासोबत काम केलं होतं. खऱ्या आयुष्यातील डोरियन ग्रेला वाढदिवसाच्या शुभेच्छा. जे ही पोस्ट वाचत आहेत त्यांच्यासाठी, हा फोटो एडिट केलेला नाही आणि ही कोणती ट्रीकही नाही."

 

निपुणने पोस्ट केलेल्या या सिनेमाच्या फोटोंमधील अभिनेता एम के रैना हे या सिनेमात हुबेहुब सारंग साठ्येसारखे दिसत असल्याचं पाहायला मिळतय. आणि म्हणूनच सारंगच्या वाढदिवसानिमित्ताने निपुणने ही हटके पोस्ट केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive