By  
on  

नंदीता वहिनींना जन्माष्टमीला आली कान्हा लाडूची आठवण

मालिकांच्या सेटवर विविध सण हे त्या सीनच्या निमित्ताने साजरे केले जातात. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या सेटवरही विविध सण आजवर साजरे केले गेले आहेत. कृष्ण जन्माष्टमीचा सणही या मालिकेत साजरा केलेला पाहायला मिळाला होता. हीच आठवण शेयर केली आहे नंदीता वहिनी साकारणारी अभिनेत्री धनश्री कडगांवकरने. 

धनश्रीने या मालिकेच्या सेटवरील आठवण शेयर केली आहे. सगळ्यांचा लाडका छोटा लाडूला जेव्हा कान्हाच्या रुपात तयार करण्यात आलं होतं तो क्षण तिने शेयर केला आहे. सोशल मिडीयावर धनश्रीने हा फोटो शेयर करून ही खास आठण पोस्ट केली आहे, आणि जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून नंदीता वहिनींची खलनायकी भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली. या मालिकेतून धनश्रीला एक वेगळी ओळख मिळाली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive