By  
on  

'तीandती' या कारणासाठी आता 8 मार्चला होणार प्रदर्शित

अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे व सोनाली कुलकर्णी या तिघांचा तीandती हा सिनेमा 1 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. पण याबाबतचं स्पष्टीकरण या सिनेमाचा अभिनेता आणि निर्माता पुष्कर जोगने आपल्या सोशल अकाऊंटवरुन दिलं आहे.

मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित तीandती सिनेमाचे प्रदर्शन एक आठवडा पुढे ढकलण्याबाबत पुष्कर म्हणतो,"1 मार्चला तीन मराठी सिनेमे प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे मराठी सिनेमाला थिएटर मिळण्यात बरीच अडचण येऊ शकते. तसेच मराठी सिनेमाचे आणि निर्मात्यांचे बरेच नुकसान होऊ शकते म्हणून मी एक आठवडा नंतर माझा सिनेमा रिलीझ करतोय. त्यामुळे प्रेक्षकांना मराठी सिनेमाचा आनंद घेता येईल"

 

https://www.instagram.com/p/BtVK6ePlE8r/?utm_source=ig_web_copy_link

 

अर्बन रोमँटिक कॉमेडी असलेल्या ‘ती & ती’ चे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. त्यामुळे पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे यांच्या ‘ती & ती’ मधून एका आगळ्या-वेगळ्या-इंटरेस्टिंग आणि मनोरंजक कथेसोबत प्रेक्षकांची लंडन सफारी पण होणार हे नक्की.

प्रेमाचा जेव्हा ट्रँगल बनतो तेव्हा सगळ्याच गोष्टीचे कन्फ्युजन वाढते. अशीच प्रेमात गोंधळ उडालेल्या तरुणाची कथा आणि भन्नाट लव्हस्टोरी असणारा ‘ती & ती’ चित्रपट 8 मार्च 2019 रोजी प्रदर्शित होत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive