By  
on  

दुबईतील ते दिवस सोनाली कुलकर्णीसाठी बनल्या आठवणी, भारतात परतली सोनाली

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही लॉकडाउनच्या आधीपासूनच दुबईत होती. फियान्से कुणाल बेनोडेकरसोबत ती वेळ घालवत होती. पण या आधी याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोघांनी साखरपुडा केला. सोनालीने तिच्या वाढदिवसाला तिच्या चाहत्यांना तिचा साखरपुडा झाल्याचं सरप्राईजही दिलं. 

मात्र लॉकडाउन संपत नसल्याने सोनालीला दुबईतचा रहावं लागलं. मग तिकडे सोनाली विविधं गोष्टी करताना दिसली. मात्र सोनाली नुकतीच भारतात परतली आहे. आणि दुबईतील ते खास क्षण आता तिच्यासाठी आठवणी बनून राहिल्याचं ती नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये सागंते.

 

नुकताच सोनालीने तिच्या वाढदिवसाला दुबईत केलेल्या डिनरचा दरम्यानचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सोनालीने लॉकडाउनमध्ये 'सोनाली सांगते ऐका' हा पॉडकास्ट शो सुरु केला. शिवाय सोनाली दुबईत कुकिंग, वर्कआउट या सगळ्या गोष्टीही करत होती. नुकतच एक व्हिडीओ साँगही सोनालीने चित्रीत केला होता. या सगळ्या आठवणींचा साठा घेऊन ती आता भारतात परतली आहे. सध्या सोनाली दुबईतील या खास आठवणींना उजाळा देत आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive