अभिनेता गश्मिर महाजनीने शेयर केली त्याच्या शाॅट आगोदरची तालीम

By  
on  

अभिनेता गश्मीर महाजनीने आत्तापर्यंत विविध सिनेमांमधून त्याच्या विविध भूमिकांमधून तो एक उत्तम अभिनेता असल्याचं दाखवून दिलय. त्याची शरीरयष्ठी, त्याचं नृत्यकौशल्य हे देखील नेहमीच चर्चेत राहिलं. त्याच्या हिंदी वेब सिरीजची सध्या सगळीकडे चर्चा आहे. 'सर्जिकल ऑफरेशन्स टीम' असं त्याच्या हिंदी वेब सिरीजचं नाव आहे.ही एक थ्रिलर वेब सिरीज आहे.

नुकतच गश्मीरने या सिरीजविषयीची गमतीशीर गोष्ट शेयर केली आहे. त्याने या सिरीजच्या शुटिंग अगोदरच्या तालीमचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात तो एक्शन सीनची तालीम करताना दिसतोय.

गश्मीरने त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

 

या व्हिडीओ पोस्टमध्ये तो लिहीतो की, "शाॅट आगोदरची तालीम. गम्मत म्हणून बघा. खरा धमाका येण्यास अजून अवकाश आहे. शॉटच्या आधी तालीम करताना. सर्जिकल ऑपरेशन्स टीमचं ऑनलोकेशन"

Recommended

Loading...
Share