पाहा Video : जेव्हा आई गाते तेव्हा..., अरुंधती म्हणजेच मधुराणीने गायलं सुमधुर गाणं

By  
on  

'आई कुठे काय करते' मालिका आता प्रचंड लोकप्रिय झाली आहे. मालिकेतील कुटुंब आणि त्या कुटुंबातील गृहीणी आई जी सगळ्यांची काळजी घेते. याचं आईच्या भूमिकेभोवती या मालिकेतील कथा फिरते. प्रेक्षकांनाही या आईमध्ये कुठेतरी त्यांची आई दिसत असावी म्हणूनच ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर देखील तितकीच लोकप्रिय झाली आहे.

या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी  अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकरने सोशल मिडीयावर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत आई म्हणजेच मधुराणी तिच्या गोड आवाजत गाणं गात आहे. 'घननिळा लडिवाळा' हे गीत मधुराणी गात आहे. मधुराणीला अभिनयासोबतच गाण्याचीही आवड असल्याचं पाहायला मिळतय. तिच्या चाहत्यांनाही तिच्या आवाजातील हे गाणं प्रचंड आवडल्याचं दिसतय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Madhurani gokhale Prabhulkar (@madhurani.prabhulkar) on

 

मधुराणीने या मालिकेत साकारलेली आई प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 

Recommended

Loading...
Share