"कठीण काळ हा कधी कधी आशिर्वादासारखा असतो..." असं म्हणत मानसी नाईकने पोस्ट केले हे फोटो

By  
on  

अभिनेत्री मानसी नाईक सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. मानसी तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करते. विशेष म्हणजे सध्या ती बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबतचे फोटो जास्त पोस्ट करताना दिसते. दोघांचे फोटो तिच्या चाहत्यांनाही प्रचंड आवडतात. सोशल मिडीयावर मानसीचा मोठा चाहतावर्ग आहे. 

मानसीने नुकतचे तिचे काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. मात्र या फोटोंसोबत मानसीने एक सकारात्मक दृष्टीकोन देणार कॅप्शन देखील लिहीलं आहे.

ती या पोस्टमध्ये लिहीते की, "कठीण काळ हा कधी कधी आशिर्वादासारखा असतो. सोडून द्यायचं आणि आयुष्याने तुम्हाला बळकट करु दे. कितीही त्रास झाला तरी मान उंचावून पुढे चालत रहायचं. हा खूप महत्त्वाचा लक्षात ठेवण्यासारखा धडा आहे जेव्हा तुमचा दिवस, महिना किंवा वर्ष वाईट जातं. कधी कधी कठीण धडे शिकण्यासारखे असतात ज्याची आपल्या आत्म्यास जास्त आवश्यकता असते. तुमचा भूतकाळ तुमची चूक नसते जेव्हा तुम्ही त्यातून शिकता. व्यावसायिक किंवा वैयक्तिकरित्या. सगळे वेडे अनुभव घ्या , धडे शिका आणि एका धन्यवाद लेबल लिहीलेल्या बॉक्समध्ये ते सगळं ठेवून द्या."

 

Recommended

Loading...
Share