पाहा Video : कुशल बद्रिकेच्या या गोष्टीमुळे भाऊ कदमला आला राग

By  
on  

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून विनोदवीर अख्ख्या महाराष्ट्राला खळखळून हसवतात. यंदाही हे विनोदवीर त्यांच्या हटके अंदाजाने प्रेक्षकांना हसवत आहेत. नुकतच या कार्यक्रमातील विनोदवीरांनी रात्रीस खेळ चालेमधील नाईक कुटुंब सादर केलं. यात कुशल बद्रिकेने माई साकारली, भाऊ कदमने अण्णा तर श्रेया बुगडेने शेवंता साकारली. 

नुकताच हा परफॉर्मन्स करतानाचा सेटवरील मजेशीर ऑफस्क्रिन व्हीडीओ कुशल बद्रिकेने सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. यात व्हिडीओत तिघही ते कोणत्या भूमिका साकारत आहेत हे सांगताना दिसत आहेत. मात्र त्यातच कुशल भाऊल विरप्पनची उपमा देतो आणि भाऊला राग येतो. हा मजेशीर व्हीडीओ सोशल मिडीयावर चांगलाच पसंत केला जातोय. 

या पोस्टमध्ये कुशल लिहीतो की, "मला कळतच नाही माझ काय चुकलं ते."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

मला कळतच नाही माझ काय चुकलं ते.

A post shared by Kushal Badrike official (@badrikekushal) on

 

या कार्यक्रमातली सगळ्या विनोदवीरांचे एकापेक्षा एक परफॉर्मन्स पाहायला मिळतात. विविध नकला करून, स्किट सादर करून या विनोदवीरांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 

Recommended

Loading...
Share