'तुला पाहते रे' मालिकेला दोन वर्षे पूर्ण, गायत्री दातारने आठवणींना दिला उजाळा

By  
on  

अभिनेत्री गायत्री दातारला तिच्या पहिल्या वहिल्या कामातय प्रचंड लोकप्रियता आणि यश मिळालं. 'तुला पाहते रे' या मालिकेत गायत्री ईशाच्या भूमिकेत झळकली. अभिनेता सुबोध भावेसोबत काम करण्याची संधी गायत्रीला या निमित्ताने मिळाली. गायत्रीच्या कामाचं प्रचंड कौतुकही झालं. ही मालिका आणि तिची भूमिका लोकांना प्रचंड आवडली. 

ही मालिका इतकी गाजली की या मालिकेचे मीम्स किंवा मालिकेच्या भागांविषयीची चर्चा सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात होऊ लागली होती. याच मालिकेला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने गायत्री तिच्या इन्स्टाग्राम या सोशल मिडीया अकाउंटवर चाहत्यांसोबत संवाद साधला. यावेळी गायत्री तिचा अनुभव आणि मालिकेच्या आठवणीही शेयर केल्या.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gayatri Datar (@gayatridatarofficial) on

 

गायत्रीने या लाईव्ह व्हिडीओमध्ये 'तुला पाहते रे मालिकेच्या टीमचे आभार मानले. शिवाय सध्या चला हवा येऊ द्याच्या नव्या पर्वातील तिच्या एन्ट्रीविषयीही ती यावेळी बोलली. 

Recommended

Loading...
Share