By  
on  

पाहा Video : "आयपीएलमध्ये पुन्हा हेलिकॉप्टर शॉट्सचा पाऊस पडेल" धोनीच्या निवृत्तीवर बोलला शरद केळकर

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आणि असंख्य क्रिकेटप्रेमी आणि धोनीचे चाहते निराश झाले. अनेकांनी सोशल मिडीयावर धोनीला ट्रिब्यूट देत त्याच्या प्रवासाविषयीच्या आठवणी शेयर केल्या.

मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार धोनीचे चाहते आहेत. या चाहत्यांपैकीच एक आहे अभिनेता शरद केळकर. धोनीच्या निवृत्तीविषयी शरद केळकरने एक खास पोस्ट केली आहे. शरदने नुकताच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केल आहे. या व्हिडीओत शरद फलंदाजी करताना दिसतोय. 

 

शरद या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहीतो की, "माहीला पुन्हा एक्शनमध्ये बघण्यासाठई वाट नाही बघू शकत. आयपीएल मध्ये हेलिकॉप्टर शॉट्सचा पाऊस पडेल आणि आपण सगळे अभिमानाने बोलू, माही मार रहा है."

शरद केळकर हा धोनीला आता आयपीएलमध्ये पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक असल्याचं या पोस्टमध्ये सांगतो.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive