By  
on  

संगीतकार सलील कुलकर्णी आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत

प्रसिध्द संगीतकार सलील कुलकर्णी यांना आपल्याला लवकरच दिग्दर्शकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. गायक, संगीतकार, लेखक आणि परीक्षक अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्यानंतर सलील कुलकर्णी आता दिग्दर्शकाच्या रुपात समोर येत आहेत. त्यांच्या वेडिंगचा शिनेमा या सिनेमाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

वेडिंगचा सिनेमाची कथा पटकथा आणि दिग्दर्शन असी सर्वच धुरा सलील कुलकर्णी यांनी सांभाळली आहे. मुक्ता बर्वे, भाऊ कदम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, शिवाजी साटम, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हनमगर, सुनील बर्वे, योगिनी पोफळे, शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार यांच्या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

दिग्दर्शक म्हणून नवी इनिंग सुरु करण्यापूर्वी सलील यांनी या कार्यपद्धतीचा अभ्यास केला. निखळ आणि हलकी फुलकी कथा असलेला हा सिनेमा १२ एप्रिल २०१९ ला प्रदर्शित होत आहे.

 

https://youtu.be/XEPSFa8mmsM

Author

Recommended

PeepingMoon Exclusive