By  
on  

पाहा Photos : वडिल संदीप पाटील यांना अभिनेता चिराग पाटीलने अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

कलाविश्वातील प्रसिद्ध वडिल-मुलाच्या जोडीत संदीप पाटील आणि मुलगा चिराग पाटील यांच्या नावाचाही समावेश आहे. एकीकडे क्रिकेटपटू संदीप पाटील तर दुसरीकडे अभिनेता चिराग पाटील अशी यांची जोडी आहे. नुकतच संदीप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने चिरागने सोशल मिडीयावर खास पोस्ट केली आहे. 

चिरागने या पोस्टमध्ये वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. चिरागने त्याच्या बालपणीचे वडिलांसोबतचे फोटो यात पोस्ट केले आहेत. शिवाय संदीप पाटील यांचेही तरुणपणाचे फोटो यात आहेत.

 

'83' या हिंदी सिनेमात चिराग पाटील हा संदीप पाटील यांचीच भूमिका साकारताना दिसणार आहे. वडिलांची भूमिका सिनेमात साकारणं चिरागसाठी आव्हानात्मक असलं तरी ही गोष्ठ त्याच्या वडिलांसाठी अभिमानास्पद असेल एवढं नक्की. या सिनेमासाठी चिरागने क्रिकेटचे धडे देखील घेतले आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive