By  
on  

'फुलपाखरु'मधील ऋता-यशोमान पु्न्हा एकत्र दिसणार या कार्यक्रमात

2017 मध्ये भेटीला आलेली 'फुलपाखरू' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. कमी कालावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. एवढच नाही तर या मालिकेतील मानस आणि वैदेहीचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडलं. ही जोडी लोकप्रिय जोडी ठरली. अभिनेता यशोमान आपटे आणि अभिनेत्री ऋता दुर्गुळे या मालिकेत या भूमिका साकारताना दिसले. या मालिकेमुळे त्यांच्याही लोकप्रियतेत वाढ झाली. 

या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी आता या मालिकेतील हे दोन्ही कलाकार पुन्हा एकदा एका आगामी कार्यक्रमात झळकणार आहेत. सिंगिंग स्टार हा नवा म्युझिकल कार्यक्रम लवकरच भेटीला येत आहे. या कार्यक्रमात अभिनेत्री ऋता दुर्गुळे सुत्रसंचालकाची धुरा सांभाळतेय. विविध कलाकार आणि गायक-गायिका या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. यापैकीच एक आहे अभिनेता यशोमान आपटे. यशोमानला गाण्याची प्रचंड आवड आहे. ही आवड आणि कला तो या कार्यक्रमाच्या माध्यमातून जोपासताना दिसेल. तेव्हा मालिकेच्या निमित्ताने नाही तर या रिएलिटी शोमधून एकाच कार्यक्रमात ऋता आणि यशोमान पाहायला मिळणार आहेत.

 

तेव्हा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर जेव्हा ऋता आणि यशोमान एकत्र दिसतील तेव्हा त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असेल असं म्हणणं वावगं ठरणार नाही.येत्या 21 ऑगस्टपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive