By  
on  

या कारणासाठी पुष्कर जोगने चक्क अभिषेक बच्चनला केलं ट्विट, अभिषेकने असं दिलं उत्तर

सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक मनोरंजन विश्वातील कलाकार एकमेकांसोबत जोडले जातात. यातच मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील कलाकार देखील या माध्यमातूनही एकमेकांशी संवाद साधताना दिसतात. अभिनेता पुष्कर जोगने नुकतच एक ट्विट केलं आहे. पुष्करने हे ट्विट थेट अभिषेक बच्चनला केलं. पुष्करचा आगामी सिनेमा वेल डन बेबीचं पोस्टर निर्मात्यांच्या कार्यालयात ठेवण्यात आलय. याच कार्यालयात या सिनेमाच्या पोस्टर स्टॅंडीच्या बाजूला अभिषेक बच्चनचा आगामी सिनेमा बिग बुलचेही पोस्टर ठेवण्यात आलं आहे. हे दोन्ही पोस्टर आजूबाजूला असलेला फोटो पुष्करने ट्विटरवर पोस्ट केला आणि अभिषेकच्या सिनेमाच्या स्टँडीसोबत त्याच्या सिनेमाचा स्टँडी शेयर करत असल्याचा आनंद व्यक्त केला आहे.

पुष्करने त्याच्या ट्विटमध्ये लिहीलं आहे की, "मला आनंद झाला आहे की माझ्या सिनेमाच्या स्टँडीच्या बाजूला अभिषेक बच्चनच्या सिनेमाचा पोस्टर आमच्या निर्मात्यांच्या कार्यालयात आहे."

 

अभिषेक बच्चननेही हे ट्विट पाहताच लगेचच पुष्करला रिप्लाय देत त्याला सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिषेक म्हणतो की, "हा माझा सम्मान आहे, सिनेमासाठी शुभेच्छा."

Author

Recommended

PeepingMoon Exclusive