'रंग माझा वेगळा' या मालिकेला कमी कालावधीत लोकप्रियता मिळाली, दीपा नावाची सावळी मुलगी आणि तिचा द्वेष करणारी सौंदर्या इनामदार अशी ही कहाणी आहे. अभिनेत्री रेश्मा शिंदे या मालिकेत दीपाच्या भूमिकेत आहे.
रेश्मा या भूमिकेसाठी सावळा रंगाचा मेकअप चढवते. मात्र खऱ्या आय़ुष्यात आणि ऑफकॅमेरा ती अतिशय सुंदर दिसते. त्या सावळ्या रंगाच्या मेकअपमध्येही तिच्या चेहऱ्यावर वेगळं तेज असतं. जणू तो रंग तिचाच आहे. मात्र चित्रीकरण झाल्यानंतर रेश्मा जेव्हा हा मेकअप काढते तेव्हा तिला अतिशय सुंदर वाटत. नुकतच रेश्माने चित्रीकरण संपल्यानंतर मेकअप काढळ्यानंतरचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
रेश्मा या पोस्टमध्ये म्हणते की, "मला रात्री सर्वात सुंदर वाटतं, जेव्हा मी माझा मेकअप काढते आणि हे फक्त मी आहे."
असं म्हणत रेश्मा तिच्या भावना व्यक्त करते. रेश्मा याआधीही काही मालिकांमध्ये झळकली आहे. तिने मराठीसह हिंदी मालिकाही केल्या आहेत. मात्र सध्या 'रंग माझा वेगळा' या मालिकेमुळे तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.