'जीव झाला येडापिसा' मालिकेच्या सेटवर शिवा आणि सिद्धीने साकारले बाप्पा

By  
on  

गणेशोत्सवानिमित्ताने बाप्पाच्या आगमनाची तयारी सगळीकडे सुरु आहे. मनोरंजन विश्वातही गणेशोत्सवाचा उत्साह जोरदार असतो. मालिकांच्या सेटवर बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु झालेली पाहायला मिळतेय. काही मालिकांच्या सेटवर गणेशोत्सवाचा सीन असल्याने बाप्पा विराजमान होतील तर काही कलाकारांची घरच्या गणपतीच्या तयारीची लगबग आहे.

'जीव झाला येडापिसा' मालिकेच्या सेटवर गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. कारण या मालिकेच्या सेटवरच बाप्पा साकारले जात आहे. शिवा, सिद्धी आणि विजया काकूंनी रंगीत चिकण मातीपासून सेटवरचा फावल्या वेळात बाप्पाच्या गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. 

 

नुकताच त्यांचा बाप्पा साकारतानाचा व्हिडीओ कलर्स मराठी वाहिनीच्या सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहेत. या व्हिडीओतून या कलाकारांनी घरातची मूर्ती तयार करण्याचा संदेश दिला आहे. 

 

Recommended

Loading...
Share