मनोरंजन विश्वातील काही कलाकार हे घरीच बाप्पा साकारून गणेशोत्सवाला त्यांचं पूजन करतात. मतीपासून इकोफ्रेंडली बाप्पा घरात साकारण्याची प्रथा अनेक कलाकारांनी सुरु केली आहे. दिग्दर्शिक रवी जाधवही त्यापैकीच एक. कित्येक वर्षांपासून रवी जाधव यांच्या घरी मातीचा घरीच तयार केलेला इकोफ्रेंडली बाप्पा आणि इकोफ्रेंडली डेकोरेशन असतं.
यंदाही रवी जाधव यांनी इकोफ्रेंडली मातीचा बाप्पा साकारला आहे. मात्र यावर्षी बाप्पाचा रंग जास्वंदी फुलासारखा आहे. नुकतच रवी जाधव यांनी साकारलेल्या बाप्पाचं रंगकाम झाल्यानंतरचा फोटो पोस्ट केला आहे.
ते या पोस्टमध्ये लिहीतात की, "मातीपासून मूर्तीपर्यंत...या वर्षाचा आमचा हा गोलू मोलू जास्वंदी रंगाचा गंपू , गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ति मोरया"
सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी आता सुरु झाली आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर असताना लगबग पाहायला मिळतेय. मनोरंजन विश्वातीलही गणेशभक्त बाप्पाच्या आगमनासाठी उत्सुक आहेत.