एक नवा रिएलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'सिंगिंग स्टार' गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे असं या कार्यक्रमाचं नाव आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक गायक-गायिका यांच्यासह गायनाची आवड आणि सूरांची जाण असलेले काही कलाकार या कार्यक्रमात गायनकौशल्य दाखवताना पाहायाल मिळतील.
अभिनेत्री प्रशांत दामले, गायिका बेला शेंडे आणि संगीतकार सलील कुलकर्णी या कार्यक्रमाचे परिक्षक आहेत. अभिनेत्री ऋता दुर्गुळे या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करेल. मात्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने सलील कुलकर्णी यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करुन एक खास गोष्ट शेयर केली आहे.
ते या पोस्टमध्ये लिहीतात की," गाणे ताऱ्यांचे ..गाणे साऱ्यांचे ..." आजपासून सोनी मराठीवर रात्री ९ वाजता . 2006 ते 2015 सातत्याने परीक्षक म्हणून काम केल्यानंतर आता पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा या भूमिकेत काम करायला मजा येत आहे.... आपणही दर काही वर्षांनी वेगळे झालेले असतो हे सुद्धा जाणवतंय.."
" गाणे ताऱ्यांचे ..गाणे साऱ्यांचे ..."
आजपासून सोनी मराठीवर रात्री ९ वाजता .
2006 ते 2015 सातत्याने परीक्षक म्हणून काम केल्यानंतर आता पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा या भूमिकेत काम करायला मजा येती आहे....
आपणही दर काही वर्षांनी वेगळे झालेले असतो हे सुद्धा जाणवतंय.. pic.twitter.com/y90jodKQ9a
— Saleel Kulkarni (@KulkarniSaleel) August 21, 2020
सलील कुलकर्णी हे तब्बल पाच वर्षांनंतर पुन्हा परिक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. याआधी त्यांनी 'सारेगम' या प्रसिद्ध कार्यक्रमासाठीही परिक्षण केलं होतं.