By  
on  

पाहा Photos : ईशा केसकरने पोस्ट केले हे क्युट फोटो, हे लिहीलं कॅप्शन

सोशल मिडीयावर काही मराठी अभिनेत्री कायम चर्चेत असतात. त्यापैकी एक आहे अभिनेत्री ईशा केसकर. ईशाचे ग्लॅमरस फोटो सोशल मिडीयावर लोकप्रिय असतात. ईशाने नुकतेच तिचे काही क्युट फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

'जय मल्हार' या मालिकेत ईशाने बानूची भूमिका साकारली होती. या मालिकेतून तिला खरी ओळख मिळाली. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत ईशाने शनाया साकारली. अभिनेत्री रसिका सुनीलने हा शो सोडल्यावर तिच्या जागी ईशाने शनायाची भूमिका उत्तम वठवली होती. मात्र आता पुन्हा ईशाने काही कारणास्तवर ही मालिका सोडली आणि त्याजागी पुन्हा रसिकाची एन्ट्री झाली. ईशाचे चाहते मात्र तिला शनाया म्हणून मिस करत आहेत.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive