By  
on  

पाहा Photos : 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या सेटवर बाप्पाचं आगमन, असं केलं बाप्पाचं स्वागत

गणपीत बाप्पा मोरया म्हणतं काही ठिकाणी बाप्पाचं आगमन होताना दिसत आहे. काही ठिकाणी बाप्पा विराजमान झाले आहेत तर काहींकडे बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. टेलिव्हिजन मालिकांच्या सेटवरही बाप्पा विराजमान झाले आहेत. बाप्पाचं आगमन होताच मालिकांच्या सेटवर आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या सेटवरही बाप्पांचं आगमन झालं आहे. गणेशोत्सवाच्या सीनचं जरी चित्रीकरण असलं तरी सेटवरही गणेशोत्सवाचं वातावरण पाहायला मिळतय. मालिकेतील कलाकारही पारंपारिक वेशभुषेत दिसत आहेत. 

राणादाची भूमिका साकारणारा हार्दिक जोशी आणि अंजलीच्या भूमिकेतील अक्षया देवधर दोघेही या निमित्ताने पारंपारिक वेशभुषेत पाहायला मिळत आहेत. चित्रीकरणामुळे या कलाकारांना घरी जाता येत नसले तरी सेटवरचं गणेशोत्सवाचा उत्साह असल्याने आनंदाचं वातावरण आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive