कोरोनाग्रस्त परिस्थितीत अनेकांनी घरातच बाप्पाची मूर्ती तयार करून त्याचं घरातच विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार ही गोष्ट गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव हे गेल्या 18 वर्षांपासून घरातच मूर्ती तयार करून त्याची प्रतिष्ठापना करतात. आणि यंदाही त्यांनी अशीच सुंदर मूर्ती तयार करून रंगवली आहे.
रवी जाधव यांनी तयार केलेल्या बाप्पाच्या मूर्तीचे काही फोटो काही दिवसांपूर्वी पोस्ट केले आहेत. यंदा जास्वंदी रंगाची मूर्ती त्यानी घडवली आहे. मात्र ही मूर्ती कशी तयार केली याचा व्हिडीओ त्यांनी नुकताच पोस्ट केला आहे.
ते या पोस्टमध्ये लिहीतात की, "असा बनविला गणेशा. आपली मुर्ती आपणच घडवायची असते, गणपती बाप्पा मोरया"