अभिनेता सुबोध भावेने देखील दरवर्षीप्रमाणे घरी बाप्पाचं स्वागत केलं. सुबोध भावे यांच्या घरीही बाप्पाच आगमन झालं आहे. सगळीकडेच गणेश चतुर्थीचा उत्साह असताना मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळीही परिवारासोबत गणेशोत्सव साजरा करत आहेत.
यंदा कोरोनाग्रस्त परिस्थितीमुळे गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा केला जातोय. याविषयी पिपींगमून मराठीला सांगताना सुबोध भावेने गणेशोत्सव मंडळांचं कौतुक केलं आहे. सुबोध भावे म्हणतात की, "यंदा अनेकांनी वेगवेगळे समाजपयोगी उपक्रम राबवले आहेत.अनेक सार्वजनिक मंडळांनीही सरकारी नियमांचं पालन करूनआपला उत्सव मर्यादीत स्वरुपात करायचं ठरवलय. सर्वांनी शांततेनं आणि साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचं ठरवलय. या सर्व गणेशोत्सव मंडळांचे खूप खूप कौतुक आणि आभार."
यासोबत या उत्सव साजरा करताना सर्व नियमांचं पालन करून कोरोनाग्रस्त परिस्थितीत काळजी घेण्याचही आवाहन सुबोध भावेने केल आहे.