यंदा कोरोनाग्रस्त परिस्थितीत अनेकांनी साध्या पद्धतिने आणि काळजी घेऊन, गर्दी न करता गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अनेकांनी घरातची मूर्ती तयार केली तर काहींनी शाडूच्या मातीची मूर्ती आणली. तर यावर्षी घरातच गणपती विसर्जन मोठ्या प्रमाणात दिसलं.
मनोरंजन क्षेत्रातील बऱ्याच कलाकारांकडे दीड दिवसांसाठी बाप्पा विराजमान असतात. बहुतांश कलाकारांनी घरातच बाप्पाचं विसर्जन केलं. अभिनेत्री स्नेहलता वसईकरकडेही बाप्पा विराजमान होते. स्नेहलतानेही घरातच बाप्पाचं इको-फ्रेंडली विसर्जन केलं आहे.
यावेळी "गणपती बाप्पा मोरय पुढच्या वर्षी लवकर या" असं म्हणत बाप्पाना निरोप देण्यात आला.