By  
on  

'आई कुठे काय करते'मधील यशने घरात पत्निसोबत साजरा केला गणेशोत्सव

गणेशोत्सवानिमित्ताने आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. कोरोनाग्रस्त परिस्थितीत यंदाचा गणेशोत्सव वेगळ्या पद्धतिने साजरा केला जातोय. मनोरंजन विश्वातील कलाकारही आपल्या परिवारासोबत हा सण साजरा करताना दिसत आहेत. 'आई कुठे काय करते' मालिकेत यशची भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक देशमुखच्या घरीदेखील बाप्पाचं आगमन होतं.

अभिषेकने नुकतेच काही फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. यावेळी तो फोटोमध्ये पत्नि आणि पेट डॉगसोबत दिसतोय. यावेळी शाडूची घरीच तयार केलेली बाप्पाची मूर्ती विराजमान दिसतेय.

 

या पोस्टमध्ये अभिषेक म्हणतो की, "शाडू ची घरी तयार केलेली मूर्ती..सजावट..आणि आवडीचा प्रसाद..अजून आपल्याला काय हवं!” गणपती बाप्पा मोरया"

'आई कुठे काय करते' या मालिकेत अभिषेक यशची भूमिका साकारतोय. यश हा अरुंधतीचा मुलगा आहे. मालिकेतील हे मात्र फार मजेशीर वाटत. या मालिकेच्या लोकप्रियतेसह मालिकेतील कलाकारही लोकप्रिय झाले आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive