By  
on  

बाळूमामाच्या रुपातील बाप्पाची मूर्ती पाहून अभिनेता सुमीत झाला आनंदी

गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविधरुपी बाप्पा पाहायला मिळत आहेत. यातच नुकताच बाळूमामांच्या रुपातील गणपती बाप्पादेखील पाहायला मिळाला आहे.

बाळूमामाच्या नावानं चांगलभलं ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. बाळूमामा भक्तांसह सगळ्यांना ही मालिका चांगलीच भावतेय. अभिनेता सुमीत पुसावळे या मालिकेत बाळूमामांच्या भूमिकेत आहे. नुकताच त्याने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेयर केला आहे. यात बाळूमामाच्या रुपातील बाप्पा पाहायला मिळत आहेत.

बाळूमामांसारख्या पेहरावातील बाप्पा या व्हिडीओत पाहायला मिळत आहेत. शिवाय तशीच बाप्पाची सजावटही करण्यात आली आहे. हे पाहून बाळूमामा साकारणाऱ्या सुमीतला प्रचंड आनंद झाला. त्याने लगेचच या बाळूमामा रूपी बाप्पांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे.

 

या पोस्टमध्ये सुमीत लिहीतो की, "( गणेश दत्तात्रे पोळ , पलुस ) यांनी केलेली ही सजावट आणि सदगुरू बाळूमामा यांच्या रूपातील गणपती बाप्पा" 

या मालिकेच्या माध्यमातून सुमीत चांगलाच लोकप्रिय झाला आहे. या मालिकेने त्याला एक वेगळी ओळख दिली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive