By  
on  

गौराईच्या 'ये गं गौरी' या नव्या गाण्यात स्मिता तांबे झळकली पतीसोबत

गणेशोत्सवाच्या उत्साहात आणखी भर असते ती गौराईच्या आगमनाची. गौराईच्या आगमनानंतर गौरी पूजन केलं जातय. मनोरंजन विश्वातील काही कलाकारांच्या घरी माहेरवाशीय गौराईचं आगमन होतं. अभिनेत्री स्मिता तांबेच्या घरीही गौराईचं आगमन होतं. 

याचनिमित्ताने स्मिता तांबे एक नवं गाणं घेऊन आली आहे. व्हिडीओ पॅलेसच्या नव्या गाण्यात स्मिता गौराईचं पूजन करताना दिसतेय. ये गं गौरी असं हे नवं गाणं असून या गाण्यात स्मिता सोबतच तिचे पती धिरेंद्रही दिसत आहेत. त्यांनी या गाण्याची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे. 

गायिका किर्ती किल्लेदारने हे गाणं गायलं असून गाण्याला स्मिता तांबेचाही कोरस आहे.

 

या व्हिडीओच्या प्रदर्शनाविषयीची पोस्ट स्मिता तांबेने केली आहे. या पोस्टमध्ये स्मिता लिहीते की, "गणरायापाठोपाठ माहेरवाशीण गौराईचे घरोघरी शुभागमन झाले आहे. "ये गं माझ्या घरी सुख घेऊन गौरी.. नाद घुमू दे गं तुझ्या पैंजणाचे दारी" म्हणत लाडक्या गौराईवरील नवे गाणे आता युट्यूबवर आले आहे. साजरी करूया 'गौर-गणपती' या सुमधूर गाण्याच्या साथीने.."

नुकतच हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive