By  
on  

पाहा Video : अभिनेत्री दिपाली सय्यदची कोरोना चाचणी निगेटिव्ह, जाणवली होती कोरोनाची लक्षणं

कोरोनाग्रस्त परिस्थितीत मनोरंजन विश्वातील कलाकारही विविध गोष्टींची काळजी घेत आहेत. अभिनेत्री दिपाली सय्यद मात्र कामानिमित्ताने बऱ्याच वेळा घराबाहेर पडली होती. मात्र काही दिवासांपासून प्रकृती बरी नसल्याने दिपालीला काळजी वाटू लागली. दिपालीने लगेचच सोशल मिडीयाच्या माध्यमातून ही गोष्टी समोर आणली आणि ती ज्यांच्या संपर्कात आली होती त्यांना सतर्क केलं. 

दिपालीने तिच्या ट्विटमध्ये लिहीलं होतं की, "कोरोनाची सुरवातीची काही लक्षणं जाणवत असल्यामुळे आज मी कोरोनाची टेस्ट करून घेणार आहे, गेल्या काही दिवसात सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अनेक लोकांशी संपर्क आला होता, त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्या कोणाला काही त्रास जाणवत असल्यास त्यांनी स्वतःची तपासणी करून घ्यावी"

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Deepali bhosale sayed (@deepalisayed) on

 

मात्र नुकतच दिपालीने कोरोना चाचणी करून घेतली आहे. दिपालीच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. नुकतच सोशल मिडीयावर व्हिडीओच्या माध्यमातून दिपालीने ही माहिती दिली आहे. मात्र अजूनही व्हायरल तापाने ग्रस्त असल्याने दिपाली घरातच आराम करतेय. या व्हिडीओतून दिपालीने चाहत्यांचे आभार मानले आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive