By  
on  

अभिनेता संजीव शाह यांचं निधन, 'व्हेंटिलेटर' सिनेमात साकारली होती महत्त्वाची भूमिका

अभिनेता संजीव शाह यांचं निधन झालं आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक राजेश मापुसकर यांनी याविषयीची माहिती त्यांच्या सोशल मिडीया पोस्टवरून दिली आहे. राजेश यांच्या व्हेंटिलेटर सिनेमात संजीव शाह यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. 

राजेश मापुसकर त्यांच्या पोस्टमध्ये लिहीतात की, "होय तो आता नाही. संजीव शाह. व्हेंटिलेटवर सिनेमातील दादा, व्हेंटिलेटरच्या प्रवासात स्वत:ला ठेवत जगाचा निरोप घेत त्याने शेवटचा श्वास घेतला. आता त्याची मैत्री नाही, प्रेम नाही, राग नाही, माझ्या फोनच्या स्क्रिनवर त्याचं नाव फ्लॅश होणार नाही. पूर्नजन्मासारखं काहीतरी असल्यास माझ्या पुन्हा परत ये."

 

संजीव शाह यांच्या निधनाने राजेश मापुसकर यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive