By  
on  

ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित चित्रपटांच्या अनुदानासाठी अक्षय बर्दापूरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोरोनाग्रस्त परिस्थितीत इतर क्षेत्रांप्रमाणे मनोरंजन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. लॉकडाउनच्या काळात चित्रीकरण बंद झाल्याने मनोरंजन विश्वाचं काम खोळंबलं. नुकतच चित्रीकरणाला सुरुवात झाली असली तरी चित्रपटगृहे बंद असल्याने तयार झालेल्या चित्रपटांचं काहीही होत नाहीय. त्यातच काही हिंदी सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आले आहेत. मात्र ओटीटीद्वारे प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांनाही शासनाचे अनुदान मिळण्याची मागणी प्लॅनेट मराठीटे संचालक अक्षय बर्दापूरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांना पत्राद्वारे केली आहे.

 मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी अक्षय यांनी पुढाकार घेऊन 'प्लॅनेट मराठी ओटीटी' हा ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे.  मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाची अनुदान योजना आहे. मात्र या अनुदान योजनेत चित्रपट चित्रपटगृहांमध्येच प्रदर्शित करण्याची अट आहे.  निर्मात्यांनी चित्रपट चित्रपटगृहात  प्रदर्शित करण्यापूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित केल्यास त्यांना शासनाच्या अनुदान योजनेला मुकावे लागेल. त्यामुळे निर्मात्यांचे नुकसान होऊ शकते.

मात्र सध्या कोरोनाग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांनाही अनुदान योजनेसाठी ग्राह्य धरण्यात यावे अशी बर्दापूरकर यांची मागणी आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive