By  
on  

आता तेलुगू आणि कन्नड भाषेतही दिसणार 'जय देवा श्री गणेशा' मालिका

जय देवा श्री गणेशा ही मालिका आता प्रचंड लोकप्रिय झाली आहे. गणेश चतुर्थीला या मालिकेला सुरुवात झाली. गणेशभक्त घरबसल्या या कहाणीचा आस्वाद घेत आहेत. अवघ्या 11 भागांची ही मालिका असून यात गणपती बाप्पाची कहाणी दाखवण्यात आली आहे.

ही मराठी मालिका प्रेक्षक आवर्जुन पाहत आहेत. आणि आता मराठीनंतर ही मालिका तेलुगू आणि कन्नड भाषेतही पाहता येणार आहे. तेव्हा मराठीसह इतर भाषीय गणेशभक्तही या मालिकेचा आस्वाद घेऊ शकणार आहेत.

 

या मालिकेत देवी पार्वतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने याविषयीची माहिती सोशल मिडीया पोस्टमधून दिली आहे. ती या पोस्टमध्ये लिहीते की, "तुम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, आता जय देवा श्री गणेशा मालिका आता तेलुगू आणि कन्नड भाषेतही असेल. मी तेलुगू भाषेत याआधी काम केलं आहे आणि माझं सगळ्यात आवडतं पात्र आता त्याच भाषेत डब होत असल्याचा मला आनंद आहे."

भाग्यश्रीने याआधी तेलुगू इंडस्ट्रीतही काम केलेलं आहे. म्हणूनत ही मालिका त्या भाषेत डब होणार असल्याचा आनंत तिने या पोस्टमधून व्यक्त केला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive