पाहा Video : बेली डान्सचा व्हिडीओ पोस्ट करून सोनाली कुलकर्णीने या कारणासाठी मानले चाहत्यांचे आभार

By  
on  

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे सोशल मिडीयावर असंख्य चाहते आहेत. सोनाली विषयीच्या बऱ्याच गोष्टी जाणून घेण्यासाठी हे चाहते तिला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. इन्स्टाग्रामवर सोनाली तिचे विविध फोटो, व्हिडीओ आणि अपडेट पोस्ट करत असते. 

सोनालीचा अभिनय आणि नृत्यकौशल्याचे इतके चाहते आहेत की सोनालीला इन्स्टाग्रावर मिलीयनमध्ये चाहते फॉलो करतात. नुकताच सोनालीने 1.5 मिलियन फॉलोवर्सचा टप्पा पार केला आहे. म्हणजेच तब्बल 15 लाख फॉलोवर्स सोनालीला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. 

 

सोनालीने हे सेलिब्रेशन हटके स्वरुपात पोस्ट केलं आहे. सोनालीने तिचा एक डान्स व्हिडीओ पोस्ट करून याविषयी चाहत्यांचे आभार मानले आहेत. या डान्स व्हिडीओमध्ये सोनाली बेली डान्स करताना दिसत आहे. 

हा व्हिडीओ पोस्ट करून सोनाली चाहत्यांचे आभार मानते. सोनालीचा डान्स तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतो. म्हणूनच की काय या मिलियन फॉलोवर्सचं सेलिब्रेशन तिने या डान्स व्हिडीओच्या माध्यमातून केलं आहे.

 

Recommended

Loading...
Share