माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर सोशल मिडीयावर त्यांना विविध क्षेत्रातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. मनोरंजन सृष्टीतील कलाकारांनीही त्यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या आठवणींना आणि त्यांच्या कार्याला सलाम करत श्रद्धांजली वाहिली. तर काही कलाकारांनी त्यांच्यासोबतची खास आठवण शेयर केल्या आहेत.
अनेक मराठी कलाकारांनी प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. या कलाकारांमध्ये अभिनेत्री अमृता सुभाष, उषा जाधव, गायिका बेला शेंडे, दिग्दर्शक रवी जाधव, अभिनेता रितेश देशमुख आणि इतर बऱ्याच कलाकारांनी या आठवणी पोस्ट करून भारतरत् प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अभिनेत्री उषा जाधवने 2012मध्ये तिला 'धग' सिनेमासाठी प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार स्विकारतानाचा फोटो पोस्ट केला आहे आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली.
अभिनेत्री अमृता सुभाषला 2014मध्ये तिला अस्तू सिनेमासाठी प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तो फोटो तिने पोस्ट केला आहे.
गायिका बेला शेंडेलाही 2014मध्ये प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. बेला शेंडेने हा फोटो पोस्ट करून ती लिहीते की, "महान नेत्यांपैकी एक."
तर दिग्दर्शक रवी जाधव लिहीतात की, "माझा लघुपट 'मित्रा'साठी या महान आत्म्याच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळण्याचा नम्र अनुभव होता. आज मी आणि राष्ट्र या व्यक्तिच्या मृत्यूवर शोक व्यक्त करतो."
Was a humbling experience to recieve the National Award for my short film ‘Mitraa’ at the hands of this great soul. Today the nation and me mourn the loss of a visionary!
RIP Pranab Mukherjee sir #rip pic.twitter.com/WYDkZlk04q
— Ravi Jadhav (@meranamravi) September 1, 2020
अभिनेता रितेश देशमुखला 'यलो' या सिनेमासाठी प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. रितेशने हा फोटो पोस्ट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Deeply Saddened!! A big loss for India. Former President of India Hon Shri #PranabMukherjee Sir will be forever remembered for his work & contribution for the development of India. My deepest condolences to @ABHIJIT_LS ji, the entire family & his millions of followers. https://t.co/nMnLj5g3Wt pic.twitter.com/FZVNEo8eh5
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 31, 2020
मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतीलही अनेक कलाकारांनी भारतरत्न प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.