अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसाठी अभिनयासह नृत्यदेखील तितकचं प्रिय आहे. तिच्यासाठी अभिनय आणि नृत्य या दोन्ही गोष्टी एकत्रच येतात. लहानपणापासूनच नृत्याची आवड असलेली सोनाली गेली कित्येक वर्ष गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नृत्य सादर करते.
नुकतच सोनालीने तिचा डान्स रिहर्सल व्हिडीओ पोस्ट केला आहे. आणि या पोस्टमध्ये ती लिहीते की, "गेल्या २०-२५ वर्षांत सांस्कृतिक कार्यक्रमांनमध्ये नाचल्या शिवाय कुठलाच गणेशोत्सवात माझ्यासाठी पूर्ण झालेला नाही.यंदा भीती होती. पण बाप्पा च्या आशिर्वादाने ही प्रथा मोडली गेली नाही याबद्दल कृतज्ञ."
गेल्या 20 ते 25 वर्षांपासून गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांसाठी तर कधी पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने सोनाली नृत्य सादर करतेय. आणि यंदा कोरोनाग्रस्त परिस्थितीत ही प्रथा मोडणार असल्याची शक्यता सोनालीला वाटत होती. मात्र यंदाही दरवर्षीप्रमाणे ही प्रथा पार पडली आहे.
सोनाली या पोस्टमध्ये पुढे लिहीते की, "हा रिहर्सल दरम्यानचा व्हिडीओ आहे. लवकरच हा कार्यक्रम तुम्हाला झी मराठीवर बघायला मिळेल. आणि हो सगळी काळजी घेऊनच तालमी आणि कार्यक्रम झालाय त्यामुळे चिंता नसावी."
तेव्हा लवकरच दिसणाऱ्या या कार्यक्रमात सोनाली नृत्य सादर करणार असल्याचं तिने या पोस्टमध्ये सांगीतलं आहे. 'एैरणीच्या देवा तुला..' या प्रसिद्ध मराठी गाण्यावर सोनाली नृत्य सादर करताना दिसेल. मात्र या दरम्यान कोरोनाग्रस्त परिस्थितीत सगळी काळजी घेऊन या गोष्टी केल्याचही ती सांगते.