अभिनेता सिद्धार्थ जाधव सोशल मिडीयाच्या माध्यमातून नेहमीच त्याचं त्याच्या परिवारावर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतो. त्याच्या आत्तापर्यंतच्या यशात तो कायम त्याच्या परिवाराला श्रेय देतोय. त्याच्या करियरमध्ये त्याची आईही मोठो आधारस्तंभ ठरली आहे.
सौ.मंदाकिनी रामचंद्र जाधव
आयुष्यात पहिल्यांदा उभं रहायला तिनं शिकवलं... उभं राहील्यावर खाली पाहीलं तर एक मोठी सावली दिसली... त्या सावलीनं सांगितलं मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मग बिनधास्त मागे वळून न पाहता पुढे जाण्याचं बळ मिळत गेलं..
Happy Birthday आये #happybirthday #aai #आई pic.twitter.com/vGq2iOvGsY— SIDDHARTH JADHAV (@SIDDHARTH23OCT) September 1, 2020
नुकताच आईच्या वाढदिवसानिमित्ताने सिद्धार्थने खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये सिद्धार्थ लिहीतो की, "सौ.मंदाकिनी रामचंद्र जाधव आयुष्यात पहिल्यांदा उभं रहायला तिनं शिकवलं... उभं राहील्यावर खाली पाहीलं तर एक मोठी सावली दिसली... त्या सावलीनं सांगितलं मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मग बिनधास्त मागे वळून न पाहता पुढे जाण्याचं बळ मिळत गेलं.. वाढदिवसाच्या शुभेच्छा."