या कारणासाठी वीणा जगतापने केलं मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरेचं अभिनंदन

By  
on  

मराठी बिग बॉसने मागील दोन सिझनमध्ये प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन केलं. पहिल्या सिझनप्रमाणे मराठी बिग बॉसचं दुसरं सिझनही तितकच चर्चेत राहिलं. दुसऱ्या सिझनमधील शिव ठाकरे आणि वीणा जगतापची जोडी लोकप्रिय ठरली. बिग बॉसच्या घरात दोघांची मैत्री झाली आणि त्यांचं प्रेम जुळलं.

मागील वर्षी शिव ठाकरे हा मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिझनचा विजेता ठरला होता. याच गोष्टीला आज एक वर्षे पूर्ण झालं आहेत. याच निमित्ताने त्याचं खास व्यक्तिने अभिनंदन केलं आहे. ही व्यक्ति दुसरी तिसरी कुणी नसून ती आहे वीणा जगताप. वीणाने सोशल मिडीयावर पोस्ट करून शिवचं अभिनंदन केलं आहे. 

 

वीणा या पोस्टमध्ये म्हणते की, "अभिनंदन शिव (1 सप्टेंबर 2019) आठवणी. या ड्रीम विनला एक वर्ष झालं." या मेसेजसह वीणाने शिवचा बिग बॉसच्या ट्रॉफीसोबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

बिग बॉसच्या घरात जशी शिव-वीणाची जोडी चर्चेत राहिली तशी सोशल मिडीयावरही ही जोडी चर्चेत असते. 

Recommended

Loading...
Share