आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत लाडक्या बापाचं विसर्जन केलं जात आहे. यंदा कोरोनाग्रस्त परिस्थितीत गणेशोत्सव दरवर्षीसारखा थाटामाटात, धुमधडाक्यात साजरा करता आलेला नसल्याची खंत कित्येकांना आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळीला देखील यावर्षी गणेशोत्सवानिमित्ताने गणपती डान्स करता आलेला नसल्याची पोस्ट तिने केली आहे. बाप्पाच्या विसर्जनात, मिरवणुकीत गणपती डान्स हा प्रचंड प्रसिद्ध असतो. बाप्पाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत वाजत गाजत मिरवणुका यंदा पाहायला मिळाल्या नाहीत. त्यामुळे गणपती डान्सही झाला नाही.
याविषयी प्राजक्ता म्हणते की, "गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या... यंदाचे वर्षी ‘गणपती डॅन्स’ नाही होऊ शकला, पुढल्या वर्षी सगळी कसर भरून काढू."
मात्र यंदा ज्या गोष्टी करता आल्या नाहीत त्या पुढील वर्षा नक्की करून असं प्राजक्ता या पोस्टमध्ये म्हणतेय. म्हणजेच पुढील वर्षी यावर्षीच्या गणपती डान्सची कसर प्राजक्ता भरून काढणार असल्याचं म्हणतेय. प्राजक्ताने या पोस्टमध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या सेटवरील तिचे फोटो शेयर केले आहेत.